सापळे !
आपण या जगात पाऊल टाकले की खय्याम म्हणतो देवाने का दैवाने ठिकठिकाणी सापळे लावलेलेच आहेत. मित्रांनो बघा जरा, हे सापळे कोणते आहेत ?
पहिला म्हणजे आपला मेंदू. हा माहिती साठवतो आणि आपले विचार भूतकाळावर ठरवतो. मग लागते सापळ्यांची रांग. खाणे, पिणे, कपडेलत्ते, संसार, गाडी, घोडा, धर्म, अध्यात्म, सुख, दु:ख, संपत्ती, चव, वास, दॄष्टी, भ्रम, यादी फार मोठी आहे, न संपणारी.
खय्याम म्हणतो,
मी जाईन तेथे आहेतच सापळे,
पाऊल टाकताच पकडीन म्हणतोस.
सुटका नाही म्हणतात सगळे,
बंडखोर मात्र मी, तुझ्या आज्ञेनेच हे सगळे.
या विरुध्द काही केले किंवा या सापळ्यातून सुटा असे सांगितले की मलाच बंडखोर ठरवले जाते. हे सगळे तुझ्याच इच्छेनेच चालले आहे, चालू देत !
जयंत कुलकर्णी.



