वाळवंट !
खय्याम म्हणतो,
सगळीकडे नीट बघ,
झुळझुळ झरे वाहत आहेत,
वाळवंट तुला स्वर्ग वाटेल, नरकाचे अस्तित्व मिटेल,
तू तुझ्या सुंदर प्रेयसीबरोबरच असणार !
स्वर्ग हा तुमच्या मनाच्या स्थितीवर असतो आणि तो बहुतेकवेळा तुमच्या संगतीत कोण आहे यावर अवलंबून असते. मित्र किंवा प्रेयसी जर संगतीत असेल तर स्वर्ग कोठेही असू शकतो. हे मात्र खरे आहे. स्वानुभवावरुन सांगतो.
माझ्या पत्नीची संगत सगळ्या कटकटी विसरायला लावणारी आहे. आणि मित्र, त्यांना विसरुन कसे चालेल ? त्यांच्या मुळे तर हे जीवन सुसह्य आहे.
जयंत कुलकर्णी.




Khup Chhan.