रक्त!
ही एक मनाच्या क्षुब्ध अवस्थेत लिहिलेली रुबाया आहे.
मागे म्हटल्याप्रमाणे मित्र (खरे) नसणे हीच अवस्था किती भयानक असू शकते हे याच्यावरुन आपल्याला कळते. यात मदिरा म्हणजे मदिराच आहे.
खय्याम म्हणतो,
सुरईच्या नरड्यातून कोणीतरी ते लालभडक रक्त काढा रे !
ती रंगीत मदीरा पेल्यात भरा.
या मदिरेशिवाय एवढ्या शुध्द मनाचे
माझे असे आज मित्रच उरले नाहीत !
मित्रांनी केलेला विश्वासघात हा मला वाटते आपल्या मनावरचा सगळ्यात मोठा घाव असतो. ती जखम भरुन येते की नाही…… हे सांगणे कठीण आहे.
मला वाटते नसावी.
हा घाव कोणाच्याही नशिबी न येओ हीच त्याच्यापाशी प्रार्थना !
जयंत कुलकर्णी.



