आज्ञा !

एक हिंदू धर्म सोडला तर इतर जवळजवळ सर्व धर्मात परमेश्वराच्या आणि माणसाच्या मधे एक प्रेषित आहे. ह्या प्रेषिताचे काम काय, तर परमेश्वराचे म्हणणे आपल्याला सांगणे. आता जर परमेश्वर सर्वशक्तीमान असेल तर त्याला ह्या मध्यस्थाची गरज का भासावी हे मला कळत नाही. म्हणून खय्यामचा परमेश्वर त्याच्या कानात सांगतोय, मला काय म्हणायचे आहे हे सरळ माझ्याकडूनच ऐक ! मला जे सांगायचे आहे ते तुला समजण्यासाठी कोणाची गरज नाही आणि आता ऐकतो आहेस तर ऐक – ह्या सगळ्यावर माझा खरोखरच अधिकार असता तर मी तुझे मद्य प्याले असते आणि त्यामुळे माझी ही विश्वनिर्मितीची धुंदी उतरली असती. म्हणजे ह्या सॄष्टीची आत्ताची अवस्था तुम्ही केली आहे ती मी निश्चितच जन्माला घातली नसती.

खय्याम म्हणतो,

आकाशवाणी कानात कुजबुजली,

आज्ञा शक्यतो माझ्याकडूनच ऐक !

आवर्तनांवर जर माझा ताबा असता तर

तुझ्या मद्याने या धुंदीतून असते मला वाचवले !

परमेश्वराचा परमेश्वर कोण ? मला या प्रकारचा विचार आईनस्टईनने कुठेतरी मांडल्याचा आठवतोय ! त्याच्या एका लेखात ज्यात त्याने परमेश्वराच्या अस्तित्वावर चर्चा केली आहे. आठवती आहे का कुणाला ?

जयंत कुलकर्णी.

~ by जयंत on एप्रिल 16, 2010.

One Response to “आज्ञा !”

  1. wah whah! kya baat!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.