तुझी दाढी आणि माझ्या मिशा ! :-)
बर्याचवेळा आपण परमेश्वराला साकडे घालतो, नवस बोलतो, त्याला प्रलोभन दाखवतो, रडतो, भेकतो आणि माझी इच्छा पूर्ण कर म्हणतो. जणूकाही त्याला एवढेच काम आहे ! तसेच त्याला घाबरुन आपण मद्य पिणार नसू (म्हणजे या संसारचा उपभोग घेणार नसू, संन्यास घेणार असू) तर तसे काही करायचे कारण नाही कारण ते बघण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही कारण त्याला इतर भरपूर कामे आहेत. थोडक्यात काय देवाला मागणे मागून संकटात टाकू नका आणि त्याला घाबरुन ह्या आयुष्याचा उपभोग घ्यायच थांबवू नका !
खय्याम म्हणतो,
आल्या हातात दोन सुरया मद्याच्या,
तर खुशाल पीत रहा मित्रांच्या मैफिलीत,
काळजी नको, घाबरायचे कारण नाही
तुझी दाढी आणि माझ्या मिशांसाठी त्याच्याकडे वेळ नाही.
थोडक्यात काय, आपण करु तेच वास्तव आहे. आनंदात निर्भयपणे जगणे हेच मह्त्वाचे. ते नैसर्गिक आहे.
जयंत कुलकर्णी.



